चॅनेल बेटे
चॅनेल बेटे : इंग्लिश खाडीतील द्वीपसमूह. क्षेत्रफळ १९४ चौ. किमी.; लोकसंख्या १,२५,२४० (१९७०). ही बेटे फ्रान्सच्या वायव्य किनाऱ्यापासून १५ ते ५० किमी. आणि इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यापासून ८० ते १५० किमी. दूर असून रोशेदूव्र व शोझे ही फ्रेंच सत्तेखालील बेटे वगळता, जर्सी, गर्न्सी, ऑल्डरनी, सार्क ही बेटे व इतर अनेक लहानसहान बेटे, खडक वगैरे प्रदेश आकडेवारीसाठी युनायटेड किंगडममध्ये समाविष्ट असला, तरी त्यावर प्रत्यक्ष सत्ता ब्रिटिश राजाची (किंवा राणीची) असते.